Arvind Kejriwal – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामधील अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना १८ जानेवारी रोजी चौकशीला पाचारण करण्यात आले. केजरीवालांनी या आधीची तिन्ही समन्स धुडकावली आहेत.
केजरीवाल यांनी आतापर्यंत 3 जानेवारी, 2 नोव्हेंबर आणि 22 डिसेंबर अशा तीन वेळा ईडीने जारी केलेले समन्स नाकारताना ही समन्स “बेकायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित”असल्याचे म्हटले आहे.
केजरीवालांनी म्हटले आहे की, ते ईडीला सहकार्य करण्यास तयार आहेत, परंतु एजन्सीचा हेतू त्यांना अटक करण्याचा आणि निवडणूक प्रचारापासून रोखण्याचा आहे.
या प्रकरणात २ डिसेंबर २०२३ रोजी दाखल करण्यात आलेल्या सहाव्या आरोपपत्रात, आप नेते संजय सिंह आणि त्यांचे सहकारी सर्वेश मिश्रा यांचे नाव घेऊन, ईडीने दावा केला आहे.
की आपने त्यांना या प्रकरणात मिळालेले लाचेचे ४५ कोटी रूपये गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरले आहेत. मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दोन वरिष्ठ आप नेते या प्रकरणात आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत.