Attack on Chinese citizens – पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर आत्मघातकी हल्ला झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटकांनी भरलेले अज्ञात वाहन चिनी नागरिकांच्या वाहनाला धडकले आणि स्फोट झाला. (Attack on Chinese citizens in pakistan, 5 killed)
या हल्ल्यात वाहन चालकाचाही मृत्यू झाला आहे. असे सांगण्यात येत आहे की, हा हल्ला झाला तेव्हा चिनी नागरिक इस्लामाबादहून दासूच्या दिशेने जात होते. पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे आत्मघाती हल्ले झाले आहेत आणि चीनने अशा प्रकरणांवर जोरदार टीकाही केली आहे.
गेल्या वर्षी बलुचिस्तानमध्ये चार चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले होते, एका आत्मघातकी हल्ल्यात ते सर्व ठार झाले होते. त्यांच्याशिवाय दोन दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराचे जवानही मारले गेले. त्याआधी दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये 9 चिनी नागरिकांचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. तेथील लिबरेशन आर्मी आणि त्यांचे लढवय्ये असे हल्ले करत राहतात. वास्तविक, चीनची मोठी गुंतवणूक बलुचिस्तानमध्ये आहे, सीपीईसी प्रकल्पही येथून जातो, ज्याला बलुचिस्तानचा विरोध आहे. त्यामुळे असे आत्मघातकी हल्ले नेहमीच होत असल्याचे दिसते.