Article 370 : अभिनेत्री यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या चित्रपटात गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत कोण साकारणार? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. या चित्रपटामध्ये अभिनेता किरण करमरकर अमित शाह यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेतील अरुण गोविल दिसणार आहे. या चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी देखील दिसणार आहे.ट्रेलरमधील त्यांच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले अशामध्ये आता या चित्रपटातील आणखी एका व्यक्तीचा आकर्षक लूक समोर आला आहे. किरण करमरकर हे या चित्रपटात अमित शाह यांची भूमिका साकारणार असून ते हुबेहुब त्यांच्या सारखेच दिसत आहेत. अमित शाह यांच्या भूमिकेतील किरणचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
View this post on Instagram
आदित्य जांभलेने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांची निर्मिती यांनी ‘आर्टिकल 370’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘आर्टिकल 370’ या सिनेमाचं शूटिंग काश्मीरमध्ये करण्यात आले होते. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या ऐतिहासिक निर्णयामागची कामगिरी चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरनंतर अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.