शिक्रापूर -वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका व्यक्तीचा टेम्पो फसवणूक करून नेला होता. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी 10 दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यातील टेम्पो जप्त करीत आरोपीला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.
दादा कांतीलाल भोंडवे (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर विजय बबन भंडारे (रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. पुढील तपास पोलीस शिक्रापूर पोलीस करीत आहेत.