देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्यास अटक

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले आश्वासन पाळले

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हिडीओने राज्यात एकाच खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, याचे विधानसभेतही तीव्र पडसाद उमटले होते. यावर फडणवीस चांगलेच आक्रमक झाले होते. फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. फडणवीसांविषयी आरोप करणाऱ्या युवराज दाखले याला वाकड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी युवराज दाखले याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने खळबळ उडाली. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने वादग्रस्त दावा केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा आरोप दाखले याने केला.

याप्रकरणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सदस्या कोमल रमेश शिंदे यांनी फिर्याद दिली होती. संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे फडणवीस यांची बदनामी होत असल्याचे लक्षात येताच भाजपा कार्यकर्त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी दाखले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी फडणवीस यांच्याविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे गुरुवारी विधानसभेत पडसाद उमटले. याप्रकरणी भाजपाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.