काश्‍मीरमधील स्फोटात लष्करी जवान शहीद; तिघे जखमी

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले, तर तीन जवान जखमी झाले. ती घटना कुलगाम जिल्ह्यात घडली. लष्कराच्या गस्ती पथकाला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी एका ठिकाणी आयईडी स्फोटके पेरून ठेवली.

त्या आयईडी स्फोटात चार जवान जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी श्रीनगरमधील लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले.

उपचारावेळी एका जवानाची प्राणज्योत मालवली. प्रारंभी दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवल्याची माहिती पुढे आली होती.

मात्र, संबंधित स्फोट आयईडीमुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्या स्फोटामुळे संबंधित परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.