कुपवाडा – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ताजी माहिती मिळेपर्यंत खोऱ्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कर आणि पोलिसांची कारवाई सुरू होती. लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
यासोबतच पोलिसांची कारवाईही सुरू आहे. एलओसीवर दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, मात्र दहशतवाद्यांचा हा नापाक कट वेळीच उधळून लावला.
श्रीनगर-स्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
“कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, माछिल सेक्टरमध्ये सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत, ऑपरेशन सुरुच असल्याचे पोलिस प्रवक्त्याने ट्विटरवर पोस्ट केले.