लष्करप्रमुख जम्मू काश्‍मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली – लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे दोन दिवसांच्या जम्मू काश्‍मीरच्या दौऱ्यावर जात असून ते तेथील सुरक्षा स्थितीचा आणि लष्करी सज्जतेचा आढावा घेणार आहेत. जम्मू काश्‍मीरात दहशतवादी कारवाया वाढल्या असून दहशतवाद्यांनी आजच पुन्हा दोन बिहारी मजुरांची हत्या केली आहे.

बिगर स्थानिकांवर गेल्या 24 तासांतला हा तिसरा मोठा हल्ला आहे. या वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर लष्कर प्रमुखांच्या जम्मू काश्‍मीर दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. लष्कर प्रमुख नरवणे हे सीमावर्ती भागालाही भेट देणार असून ते तेथे तैनात असलेल्या जवानांशी तसेच अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत.

त्यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष ग्राऊंड लेवलच्या स्थितीची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.