मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची हॉट गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर सुद्धा या जोडीचे लाखो चाहते आहेत. मलायका सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सुद्धा ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
अनेक ठिकाणी मलायका आपल्या बॉयफ्रेंड म्हणजेच अर्जुन कपूर सोबत दिसून येते. डिनर असो वा कॉफी डेट सर्वच ठिकाणी मलायका आणि अर्जुन सोबत असायचे. फॅन्स सुध्या त्यांच्या जोडीला भरभरून प्रेम देतात.
मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका एकत्र न दिसल्यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांमुळे त्या दोघांच्या चाहत्यांनाही जबरदस्त धक्का बसला होता. पण या सर्व चर्चांवर अर्जुन कपूरपाठोपाठ मलायकानेही प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
नुकतंच अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर मलायकासोबतचा एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. यामध्ये ते दोघेही अतिशय क्युट दिसत आहे. या दोघांचा हा फोटो पाहून त्यांच्यात सर्व काही व्यवस्थित असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जुनने या फोटोला एक कॅप्शन सुद्धा दिल आहे.
“अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा, आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम…’ या आशयाचे कॅप्शन अर्जुनने दिले आहे. दरम्यान अर्जुनची ही पोस्ट पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच अनेकांनी ही जोडी कायम टिकावी, यासाठी प्रार्थनाही केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टला त्याची गर्लफ्रेंड मलायकाने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. मालयकाने काहीही न लिहिता फक्त हार्ट इमोजी शेअर केला आहे.