मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर सध्या त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच दिग्दर्शक थ्रेड्स या नवीन अॅपच्या लॉन्चमध्ये सामील झाला होता. यानिमित्त त्याने चाहत्यांसाठी आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले होते. यावेळी त्याला चाहत्यांनी अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. खाजगी आयुष्यापासून ते सिनेसृष्टीतील अनेक प्रश्नाची त्याने स्पष्टपणे उत्तरे दिली.
धर्मा प्रॉडक्शन आणि शाहरुख खान यांच्यातील संभाव्य प्रोजेक्टबाबत चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारला, तर काहींनी करणला विचारले की दिग्दर्शक म्हणून त्याला सर्वात जास्त कशाचा खेद वाटतो.एका यूजरने त्याला विचारले, “तू गे आहेस का ?” असा थेट सवाल देखील विचारला. करणने देखील त्याला यावेळी उत्तर दिल.
यावेळी करणला एकाने तुला कोणत्या गोष्टीची खंत वाटते का ? असं विचारला असता तो म्हणाला,”‘मला माझी आवडती अभिनेत्री श्रीदेवी मॅमसोबत काम करण्याची आणि दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही.’ दुसऱ्या एका व्यक्तीने विचारले, “भविष्यात धर्मा आणि शाहरुख खान एकत्र काम करतील का?” करणने उत्तर दिले, “मला कोणतेही सरप्राईझ विचारू नका, मी खोटे बोलणार नाही.”
तू गे आहेस का ? असं देखील एकाने विचारले. त्यावर, तुम्हाला इंटरेस्ट आहे का ? असं उत्तर यावेळी करण जोहरने यावेळी युजरला दिले. आणखी एकाने विचारले, “तुम्ही 20 वर्षांच्या तरुणाला काय सल्ला द्याल ज्याला तुमच्यासारखे फिल्ममेकर व्हायचे आहे?” करणने मनापासून उत्तर दिले आणि लिहिले, “निगेटिव्ह लोकांचे ऐकू नका ! स्वतःवर विश्वास ठेवा आणि चित्रपटात खोलवर जाण्यापूर्वी त्याबद्दल शिक्षित व्हा.