तेहरान :- इराणमध्ये दोन दोषींना सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आले आहे. या दोघांना 2022 मध्ये शाह चेरांघ पवित्र स्थानावरील हल्ल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुले मिळून 10 जण ठार झाले होते.
या दोन आरोपींबाबतचा प्राथमिक निकाल मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर या दोघांच्या वकिलांनी या निकालाविरोधात अपील केले होते. इराणच्या सर्वोच्च न्यायाधिकरणाने या निकालाचा फेरविचार केला होता. त्यामध्ये या हल्ल्याच्या कटाला आणि अंमलबजावणीला या दोघांनी थेट मदत केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
26 ऑक्टोबर 2022 रोजी फार्स प्रांताची राजधानी असलेल्या सिराझ शहरातील शाह चेरांघ स्थानामध्ये झालेल्या गोळीबारात एकूण 13 जण ठार झाले होते. तर अन्य 30 जण जखमी झाले होते.
या हल्ल्यादरम्यान जखमी झालेला हल्लेखोर देखील रुग्णालयात उपचारादरम्यान ठार झाला होता. द ताकफीरी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.