मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ अभिषेक बच्चनलाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. मात्र ते होम क्वारंटाईन झाले होते. अभिनेत्री ऐश्वर्यासह तिची मुलगी आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्याला हलका ताप आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि घरातील इतर स्टाफच्या कोरोना चाचण्या करण्यात आली होती. सुदैवाने पत्नी जया बच्चन, ऐश्वर्यासह तिची मुलगी आराध्या यांच्या प्राथमिक चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या. दुसऱ्या चाचणीत ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघी पाॅसिटीव्ह आल्या होत्या.
दरम्यान, बच्चन कुटुंबीयांवर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे कोरोना पाॅसिटीव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर रुग्णालयातील अनेक माहिती किंवा त्यांच्या संबंधित माहिती ते ट्विटरवर पोस्ट करत असतात.