मुंबई – सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्यावर चित्रित केलेले ‘मसकली २.०’ हे रिमेक गाणे प्रदर्शित झाले. दिल्ली ६ या चित्रपटातील हे मूळ गाणं पुन्हा रिमिक्स करून चित्रित करण्यात आलं आहे. संगीत दिग्दर्शक ए आर रेहमानने आता याबाबत इनडिरेक्टली भाष्य केल आहे. रिमिक्स व्हर्जन रेहमानला रुचलेलं दिसत नाही.
रेहमानने याबाबत एक ट्विट केलं आहे. मसकली प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना या गाण्याकडून फार अपेक्षा होत्या. रेहमानने जास्त काही न बोलता ‘ओरिजिनल ‘मसकली’चा आनंद घ्या. असे म्हणत एक लिंक शेअर केली आहे. त्यासोबतच त्याने भली मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. ज्यात रेहमानने मूळ गाणं बनवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे वर्णन केले आहे. ज्यासाठी ३६५ दिवस तब्बल २०० हुन अधिक वेळा प्रयत्न केल्याचे ते सांगतात.
या रिमिक्स गाण्याबाबत चाहत्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी हे रीमिक्स पचनी पडलेल नसल्याचे सोशल मीडियावरील कमेंटमधून दिसून येत. २००९ मध्ये अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं मसकली हे गाणं चांगलच हिट झालं होत. ए आर रेहमानने त्यासाठी संगीत दिगदर्शन केलं होत.