वाघोली : वाघोली, येथील योगिता सातव सहकाऱ्यांसह सहलीला गेल्या असताना बस चालकास फिट आल्याचे दिसताच त्यांनी स्वतः स्टेअरिंग हातात घेत बसचे नियंत्रण केले.
संकटकाळी न डगमगता प्रसंगावधान राखत त्यांनी बस ड्रायव्हरसह आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. याबद्दल योगिता सातव यांचा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्कार केला.
याप्रसंगी उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला. यावेळी सुरेखाताई ठाकरे उपस्थित होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून योगिता सातव यांचे कौतुक झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.