टाकळी हाजी (वार्ताहर)- अखिल शिक्षक संघाच्या वतीने शिरुर तालुक्यात नव्याने केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्र प्रमुख शिवाजीराव वाळके तर मुख्याध्यापक अरुण दुर्गे, सुषमा शितोळे, सुनिता जगताप, रोहिणी कर्डिले, मंदा चोरे यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेत पदवीधर शिक्षिका म्हणून नियुक्त झालेल्या अभिलाषा अनिल महाजन यांचेही अभिनंदन करण्यात आले. शिक्षकांच्या हक्कासाठी सतत लढणारी संघटना म्हणून अखिल शिक्षक संघटनेचा आवर्जून उल्लेख केला जातो. असे केंद्रप्रमुख वाळके यांनी व्यक्त केले.
यावेळी सर्व सत्कारर्थींनी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, सुरेश थोरात, ललिता साकोरे, अध्यक्षा साधना खोमणे, अध्यक्ष अशोक पठारे, व्हाइस चेअरमन शर्मिला निचित, पतसंस्था संचालक संदीप थोरात; अर्जुन निचित, धनंजय जाधव, गणेश पवार, भरत घायतडक, सुभाष थोरात, नवनाथ निचित, भाऊसाहेब जाधव, गोपीनाथ जाधव, लक्ष्मण जगताप, संजय थोरात, वंदना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.