निलेश गिरमे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाघोली : राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी पुणे शहर युवा सेना प्रमुख निलेश गिरमे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी वेळ काढून आपल्या लाडक्या कार्यकर्त्याच्या कार्यालयास भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अनोखे सरप्राइज दिले आहे. निलेश गिरमे हे पुणे शहर परिसरात सर्व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन स्तरावर करत असलेल्या पाठपुराव्याचे राज्याचे सहकार मंत्री सावे यांनी कौतुक केले आहे. सहकार मंत्र्याच्या हस्ते गिरमे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे शहर होर्डिंग असोसिएशन व पुणे नगर वाहतूक नियंत्रण समिती यांचे कार्यवाहक संपत आबा गाडे, ज्ञानेश्वर पठारे यांच्या हस्ते निलेश गिरमे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील सुमारे तीन हजार नागरिकांना मोफत फळवाटप तसेच भाजीपाला वाटप उपक्रमाचा शुभारंभ सहकार मंत्री अतुल साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गिरमे यांना वाढदिवसाच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी निलेश गिरमे यांच्याकडून शासन स्तरावर करण्यात येणारा पाठपुरावा कौतुकास्पद आहे. काम करण्याची उमेद आणि कामातील प्रामाणिकपणा हे त्यांच्या कडून नवी शिकवण देत आहेत.
संपत आबा गाडे, मुख्य समन्वयक, वाहतूक नियंत्रण समिती पुणे