पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासाठी ट्विट केले आणि मन की बात कार्यक्रमाच्या 100व्या भागाबाबात शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. वास्तविक, बिल गेट्स यांनी रविवारी मन की बातच्या 100 व्या भागासाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. याबाबत आता पंतप्रधानांनी गेट्स यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक काय म्हणाले?
बिल गेट्स यांनी 29 एप्रिल रोजी एका ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींच्या मासिक कार्यक्रमाचे (मन की बात) कौतुक केले होते. त्यात ते म्हणाले होते- “मन की बातने महिलांना आर्थिक, सक्षमीकरण, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मुद्द्यांवर विकासाच्या क्षेत्रात जागरुक केले आहे.”
काय म्हणाले पीएम मोदी?
यावर पीएम मोदींनी त्यांचे आभार मानले आणि म्हणाले, “मन की बात कार्यक्रमाचे कौतुक केल्याबद्दल मी माझे मित्र बिल गेट्स यांचे आभार मानू इच्छितो. हा कार्यक्रम पृथ्वीला अधिक चागले बनवण्यासाठी भारतातील लोकांची सामूहिक भावना प्रतिबिंबित करतो, यासाठी स्वतः श्री. गेट्स उत्साही आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासात त्याचा स्व-विकास ध्येयासह अनुनाद चांगला स्पष्ट झाला आहे.”