नवी दिल्ली – देशाच्या सर्वोच्च न्यायालयात दोन नवीन न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश सुधांशु धुलिया आणि गुजरात हायकोर्टाचे जज जमशेद पारीदवाला यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणनू नियुक्ती झाली.
केंद्र सरकारने त्यांच्या नावांची शिफारस झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीची अधिसूचनाही जारी केली आहे. हे नवीन न्यायाधिश सोमवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.
पारीदवाला हे पारशी समाजाचे असून देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर पाच वर्षांच्या अवधीनंतर प्रथमच अल्पसंख्यक समाजाचे न्यायाधिश नियुक्त झाले आहेत. या आधी सन 2017 मध्ये अल्पसंख्यक समाजाचे एस अब्दुल नजीर यांची सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली होती.