नवी दिल्ली – पटियाला हाऊस कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूनेविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पश्चिम बंगालच्या कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिल्याने ईडीच्या अर्जावरून रुजिरा बॅनर्जी यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
रुजिरा बॅनर्जी ममता बॅनर्जी यांचा पुतण्या टीएमसी सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी आहेत. ईडीने रुजिराला अनेकवेळा समन्स बजावले आहेत पण त्या एकदाही चौकशीसाठी हजर राहिल्या नाही. यानंतर, ईडीच्या अर्जावरून न्यायालयाने रुजिरा बॅनर्जीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांची दोनदा चौकशी केली आहे. परंतु वारंवार समन्स बजावूनही रुजिरा बॅनर्जी चौकशीत सहभागी होण्यासाठी तपास यंत्रणेसमोर हजर झाल्या नाहीत, त्यामुळे हे वाॅरंट जारी करण्यात आले आहे.