10 महानगरपालिका पैकी 9 काँग्रेसच्या ताब्यात
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या नागरी संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. छत्तीसगडमध्ये 21 डिसेंबर रोजी 10 महानगरपालिका, 38 नगरपालिका आणि 103 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले.
10 महानगरपालिकांवर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 9 महानगरपालिका जिंकल्या आहेत. तर एका महानगरपालिकेत भाजपचा विजय झाला आहे. राज्यात सुकमासह इतर अशा अनेक नगरपंचायती आहेत जिथे पहिल्यांदाच कॉंग्रेसचे आपले खाते उघडले आहे.
21 डिसेंबर रोजी राज्यातील दोन हजार आठशे 40 प्रभागांसाठी मतदान झाले. तेथे दहा हजार एकशे 62 उमेदवार रिंगणात होते. नागरी निवडणुकीत कॉंग्रेसने एक हजार दोनशे 83 तर भाजपाने एक हजारे एकशे 31 जागा जिंकल्या आहेत.
आमचे काम जिंकले: कॉंग्रेस
छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन मरकाम म्हणाले की, शहरी भागात अनेकदा भाजपाचा विजय झाला आहे, परंतु कॉंग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. कॉंग्रेसने एका वर्षाच्या सरकारच्या कामांच्या जोरावर निवडणूक लढविली. कॉंग्रेसवर जनतेने ज्या पद्धतीने विश्वास व्यक्त करत सरकारच्या कामांवर समाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान झारखंडच्या 81 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसांपूर्वी 23 डिसेंबरला लागले. या निवडमुकीत भाजपला आपली सत्ता गमवावी लागली आहे. 81 जागांपैकी कॉंग्रेस-झामुमो-आरजेडी आघाडीने 47 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत.
24 वर्षांपासून जिंकत असलेली जमशेदपूर पूर्व जागा माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांना गमवावी लागली आहे. रघुवर यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ, विधानसभा अध्यक्ष दिनेश ओरावण हे निवडणूक हरले आहेत.