सातारा -गेल्या आठवडाभरात बाधितांची संख्या घटल्याने “पॉझिटिव्हिटी रेट’ कमी झाला असला तरी दुसऱ्या बाजूला मृत्युदर वाढताच असल्याने चिंता कायम आहे. गेल्या 24 तासांत आणखी 22 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. मृतांचा एकूण आकडा 1273 झाला आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना पुसेगाव, ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, सोनगाव, ता. जावळी येथील 52 वर्षीय पुरुष, शिवथर, ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, येणके, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, कळंबे, ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, खराडवाडी, ता. पाटण येथील 51 वर्षीय पुरुष, अंबळे, ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, देगाव, ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, केंजळ,
ता. वाई येथील 54 वर्षीय महिला, कण्हेर, ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, गोरेगाव वांगी, ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, सोनगाव, ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, वरकुडे बुद्रुक, ता. शिराळा (सांगली) येथील 70 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, कोडोली,
ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, वरकुटे मलवडी, ता. माण येथील 77 वर्षीय पुरुष, कराडमधील 60 वर्षीय महिला, अंगापूर वंदन, ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोरेगावातील 75 वर्षीय पुरुष, राजापूर, ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला, धनगरवाडी, ता. सातारा येथील 91 वर्षीय पुरुष, अशा एकूण 22 करोनाबाधितांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील 476 जणांना डिस्चार्ज
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून मंगळवारी संध्याकाळपर्यंत 476 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 619 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत 31,229 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 57, कराड 18, फलटण उपजिल्हा रुग्णालय 30
कोरेगाव 35, वाई 63, खंडाळा 33, रायगाव 70, पानमळेवाडी 64, मायणी 3, महाबळेश्वर 30, पाटण 14, दहिवडी 24, खावली 53, पिंपोडा 13 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 112 अशा एकूण 619 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.