चिंता कायम! सातारा जिल्ह्यात पुन्हा दोन बाधितांचा मृत्यू

आणखी 94 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (दि. 17) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 94 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, गेल्या 24 तासांमध्ये दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांचा आकडा व उपचाराखालील रुग्णसंख्या वाढत आहेत. त्याचबरोबर करोनामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे रोखता आलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हावासीयांना दिलेला इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात शुक्रवार पेठ दोन, शाहूपुरी, सदरबझार, भवानी पेठ प्रत्येकी एक, इतरत्र 11, खोजेवाडी तीन, वडूथ दोन, सैदापूर, कोपर्डे, कळंबे, चिंचणेर, खिंडवाडी प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात कराड शहर एक, 

पाटण तालुक्‍यात गव्हाणवाडी एक, वाई तालुक्‍यात कवठे, बावधन प्रत्येकी दोन, वाई शहर, सुरुर प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यात पवारवाडी, वाखरी प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात मायणी, वडूज प्रत्येकी तीन, कातरखटाव, 

नेर प्रत्येकी दोन, चितळी, पुसेगाव, निढळ प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात दहिवडी 14, मार्डी दोन, म्हसवड, शिवरी, भालवडी, गोंदवले बुद्रुक, देवापूर प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात एकंबे तीन, कोरेगाव, आसनगाव प्रत्येकी दोन, वांजोळी, अंगापूर प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात लोणंद चार, खंडाळा एक, महाबळेश्वर तालुक्‍यात महाबळेश्वर, 

पाचगणी प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात करंडी, केंडंबे प्रत्येकी एक, इतर दोन, बाहेरील जिल्ह्यांमधील बीड, सांगली, पुणे प्रत्येकी एक, असे 94 नागरिक बाधित झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना वडूज, 

ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष व जकातवाडी, ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, अशा दोन बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या 1845 तर बाधितांची एकूण संख्या 57 हजार 751 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.