अनुरागच्या मुलीला मोदी भक्ताने दिली बलात्काराची धमकी

मुंबई – चित्रपट सृष्टीतील कलाकार मनमोकळेपणाने आपले राजकीय विचार, सामाजिक त्याचप्रमाणे व्यक्तिगत आयुष्यातील विचार सोशल माध्यमांवर जाहीर करतांना दिसतात. अनेकदा सिनेकलाकारांना सोशल माध्यमांवर ट्रोल केल्याच्या घटना सुद्धा समोर येतात. नेटकरी सिनेकलाकारांना कधी त्यांच्या पर्सनल लाईफवरून ट्रोल करतांना दिसतात तर कधी त्यांच्या विचाराचा निषेध करताना दिसतात. अशातच राजकारणापासून सामाजिक मुद्यांवर बेधडक मत मांडणारा अनुराग आपल्या या स्वभावामुळे अनेकदा ट्रोल होतो आहे. सध्या एका ट्रोलरने अशाच सर्व मर्यादा लांघत अनुरागच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली आहे.

दरम्यान या ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, अनुरागने नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले आहे. माझ्या मुलीला धमक्या देत तुमच्या विजयाचा आनंद साजरा करणा-या समर्थकांशी तुम्ही कसे निपटणार, प्लीज मला सांगा, असे ट्वीट अनुरागने केले आहे. अनुराग कश्यप अनेकदा मोदी सरकारविरोधात बोलताना दिसतो. त्यामुळे काल गुरुवारी भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मोदी समर्थकांनी लगेच अनुरागला ट्रोल करणे सुरु केले. याचदरम्यान स्वत:ला मोदी समर्थक म्हणवणा-या एका युजरने थेट अनुरागच्या मुलीला लक्ष्य करत, तिला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली. अनुरागच्या मुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.