मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. यावेळी देशभरातून या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांच्या हा चित्रपट पसंतीस पडला. तर काहींना या चित्रपटावर टीका केली. यामुळे अनेक वादही झाले होते. या चित्रपटाला अनेक मोठे पुरस्कार देखील मिळाले. नुकतेच मुंबईत फिल्मफेयर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीसह ‘बधाई दो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र ‘द काश्मीर फाइल्स’ला एकही पुरस्कार मिळाला नाही.
विशेष म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’ला 7 श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होते. तरीही एकही पुरस्कार न मिळाल्याने अभिनेता अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार या कलाकारांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते.
याप्रकरणी अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये लिहीले की, ‘इज्जत एक मेहंगा तोहफा है.. इसकी उम्मीद सस्ते लोगो से ना रखे..’ या पोस्टसोबत त्यांनी द काश्मीर फाइल्स असेही लिहिले आहे.
View this post on Instagram
याआधी विवेक अग्निहोत्रीने फिल्मफेअर अवॉर्ड्सवर ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाने दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये मोठा मान मिळवला होता. काश्मीर फाइल्स 2022 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या सिनेमावरून बराच गदारोळ झाला होता. राजकीय पक्षांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे. काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. भारतात त्याचे आजीवन कलेक्शन 252.90 कोटी आहे. तर या चित्रपटाने जगभरात 340.92 कोटींची कमाई केली होती.