अभिनेते अनुपम खेर यांना हिंदू अभ्यासात मानद डॉक्टरेट पदवी, अमेरिकन विद्यापीठाने केले सन्मानित

नवी दिल्ली – अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाने अभिनेते अनुपम खेर यांना हिंदू अभ्यासात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. फ्लोरिडा स्थित विद्यापीठाने शनिवारी एका विशेष कार्यक्रमात खेर यांना हिंदू अभ्यासातील मानद पीएचडी प्रदान केली.

अनुपम खेर म्हणाले, ‘ही पदवी स्विकारताना मला खुप आनंद वाटतो. ही एक अतिशय प्रतिष्ठित पदवी आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील प्रमुख क्षणांपैकी आहे. ही पदवी मला हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाबद्दल, जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीबद्दल बोलण्यासाठी एक व्यासपीठ देईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

ते पुढे म्हणाले की, ‘येथे लोक शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत, विशेषत: हिंदू धर्माच्या शिकवणीवर काम करत आहेत, हे पाहून मला हा सन्मान स्वीकारला पाहिजे असे वाटले. मी स्वतः हिंदू धर्माच्या शिकवणींवर विश्वास ठेवतो आणि त्यासोबतच मी मोठा झालो आहे.

अनुपम खेर सध्या आपल्या नवीन शो ‘जिंदगी का सफर’ साठी चर्चेत आहेत. ते अमेरिकेच्या अनेक शहरांना भेटी देत आहेत. भारतात परतल्यानंतर ते सूरज बडजात्या यांच्या आगामी ‘उचाई’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.