मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांच्यातील प्रेम इंडस्ट्रीत लपलेले नाही. दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या बहिणीवरचे प्रेम व्यक्त करताना दिसतो. याचाच प्रत्यय नुकत्याच एक फॅशन रॅम्पवॉक दरम्यान आला.
अर्जुनची लाडकी बहीण अंशुलाने रॅम्पवर तिच्या किलर स्टाईलने वॉक केला. यावेळी अर्जुन कपूर देखील तिथे उपस्थित होता. बहिणीला रॅम्पवॉक करताना पाहून अर्जुनने जी प्रतिक्रिया दिली त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अंशुला कपूरने मुंबईतील फॅशन वीकमध्ये चमकदार ड्रेसमध्ये रॅम्प वर अक्षरशः आग लावली. चमकदार ड्रेसमध्ये अंशुलाचा लूक खूपच हॉट दिसत होता. अंशुलाने या ड्रेसवर तिचे केस मोकळे ठेवले होते, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत होती. अंशुलाच्या रॅम्प वॉकचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
या शो दरम्यान अर्जुन कपूर देखील आपल्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला होतो. बहिणीला रॅम्पवर चालताना पाहून अर्जुनच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बहिणीला रॅम्पवॉक करताना पाहून अर्जुनला स्वतःला सावरता आले नाही आणि त्याने सर्वांसमोर आपला आनंद व्यक्त केला. अंशुला स्टेजवर येताच अर्जुनने जोरदार टाळ्या वाजवल्या त्यानंतर तो खुर्चीवरून उभा राहून बहिणीला प्रोत्साहन देण्यासाठी चेअर करू लागला.