पुणे – देशासह राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून सामाजिक अंतर , मास्क, आणि लस हेच मात्रा ठरत आहेत. रुग्ण वाढू नये यासाठी राज्य सरकारने
नुकतीच एक नियमावली जाहीर केली आहे. तर दुसरीकडे लसीकरण यावर भर दिला जातोय. यात प्रामुख्याने पुण्यामध्ये असलेल्या सिरम कंपनीने कोविशील्ड या लसीची निर्मिती केली. आता कोव्हिल्डशिडबरोबरच आता आणखी एका लसीची निर्मिती होणार आहे. मांजरीत लवकरच या लसचे उत्पादन घेतले जाणार आहे.
पुण्याच्या मांजरीत लस निर्मिती होणार असल्याने याचा फायदा राज्याला होणार आहे. भारत बायोटेकच्या मांजरीतील प्रकल्पाची औषध मानक नियंत्रण संस्थेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन आठवड्यात लस उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे. मांजरीत कोवॅक्सिनची निर्मिती होणार असून साडेसात कोटी डोस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 26 टक्क्यांवर कायम आहे. रविवारी पुन्हा दहा हजारांच्यावर कोरोना रुग्णसंख्या होती. दिवसभरात 10102 रुग्ण सापडले तर 5405 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 60 हजारांवर पोहोचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांपैकी फक्त 2332 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.