मुंबई – ‘देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली आहे…’ अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीवरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत आहे. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
अश्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. ‘संजय राऊत नटसम्राटाप्रमाणे वागतात, सकाळी वेगळं बोलायचं, संध्याकाळी वेगळं बोलायचं’, अशी टीका काल फडणवीस यांनी केली होती.
आणि यालाच प्रत्युत्तरदेत “कुणी मला खुर्ची देतं का खुर्ची अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे. ‘नटसम्राट हे महाराष्ट्राचं खूप मोठं वैभव आहे. आम्ही नटसम्राट आहे. मात्र शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही..’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे.