‘या’ मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टरच्या बहिणाला कोरोनामुळे गमवावा लागला जीव

मुंबई -भारताबाहेर पलायन केलेला गॅंगस्टर छोटा शकील याच्या आणखी एका बहिणीचे मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात निधन झाले. हमिदा फारूक सय्यद असे तिचे नाव होते. शकीलची मोठी बहीण असणाऱ्या हमिदामध्ये करोना संसर्गाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे तिला मुंब्य्रातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत्यूपूर्वी तिची करोनाविषयक चाचणी घेण्यात आली. मात्र, त्या चाचणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. शकिलची धाकटी बहीण फहमिदा हिचा मागील महिन्यात मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. छोटा शकील हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.