मांडवगण फराटा(प्रतिनिधी) : कुरुळी (ता.शिरूर) येथे 27 जुनला एक कुटुंबातील 4 जण गावी आले होते. त्यापैकी 4 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोन महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका मुलीचा काल अहवाल करोना पाॅझिटिव्ह आला होता. एक अहवाल येणे बाकी होता.परंतु आज दुपारी 4 च्या सुमारास त्यातील पुरुषाचा करोना अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली आहे.
कुरुळी येथील हा इसम गावी आल्यानंतर त्याला रविवारी सर्दी, खोकला, तापाचा ञास होऊ लागल्याने तो उपचारासाठी गेला असता तेथे त्याच्या कुटुंबातील 4 जणांची करोना तपासणी केली असता आज त्याचा करोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
खबरदारी म्हणून मारूती पाटोळे, बापु झिटे, सुहास डोईफोडे, विनोद पोळ, कापसे, नागवे यांसह आदीनी सदर रुग्णाच्या घराजवळील सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या 8 जणांना होमक्वारटाईन करण्यात आले आहे. गावातील किराणा दुकाने काही ठराविक वेळेत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच सोनाली देशमुख यांनी सांगितले.