बारामती(प्रतिनिधी): बारामती शिक्षक क्रेडिट सोसायटीच्या अशोकनगर येथील वसतिगृह इमारतीचे बांधकाम दर्जेदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत बांधकाम व नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन गजानन गाढवे व व्हॉइस चेअरमन राजेंद्र होले यांनी दिली.
बारामती तालुका शिक्षक को. ऑप. क्रेडिट सोसायटी ही बारामती तालुक्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था असून अशोकनगर येथे संस्थेचे वसतिगृह आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार असून दर्जेदार काम होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामात लक्ष घालावे अशी मागणी संचालक मंडळाने पवार यांची भेट घेऊन केली आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामी मार्गदर्शन करण्यास मान्यता दिल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली यावेळी शिक्षकनेते ह.मा.जगताप, देविदास ढोले, तानाजी भोसले, गेनबा आगवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते
लाभांश वाटपाची परवानगी द्या…
कोरोना आजारामुळे वार्षिक सभा होत नसल्याने राज्यातील शिक्षक पतसंस्था व बँकांना लाभांश वाटण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी प्राथमिक शिक्षक संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली