जगभरात सध्या करोना व्हायरसने थैमान घातले असून यात हॉलीवूडसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनाही या व्हायरसने आपल्या जाळयात ओढळले आहे. बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकतेच एक ट्वीट करत तिचा करोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
तसेच तिने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. रकुल प्रीत सिंहने ट्वीट केले की, मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की मला करोनाचा संसर्ग झाला आहे. मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. माझी प्रकृती स्थीर आहे. सध्या मी आराम करत असून लवकरच शूट करण्यास सज्ज होईन. तसेच जे कोणी माझया संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनही तिने केले आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रकुल प्रीत सिंहने आगामी “मेडे’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. यात ती एका पायलटची भूमिका साकारणार आहे. या थ्रिलर ड्रामा चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अजय देवगन मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्ध अजय देवगण करत आहे. या चित्रपटाकडून रकुल प्रीत सिंहला खूप अपेक्षा आहेत.