मुंबई : शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठे शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. कारण शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती मिळत आहे.
ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात प्रवेश करण्याचा तडाखा सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी एक आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिकेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचा तडाखा सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे.
आतापर्यंत अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे करणार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018 साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती .