मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. ज्यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. अवघ्या लग्नाच्या चार महिन्यांनंतरच ती गरदोर राहिल्याने तिची चांगलीच चर्चा रंगली होती. नुकतेच स्वरा भास्कर पतीसोबत मुंबई विमानतळावर दिसली. येथील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई विमानतळावर स्वरा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. यावेळी तिने काळ्या रंगाच्या सुंदर शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिने पतीची गळाभेट घेत त्याला कीसही केले. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी ती खुप आनंदी असल्याचे देखील दिसून येत आहे.
Sometimes all your prayers are answered all together! Blessed, grateful, excited (and clueless! ) as we step into a whole new world! 🧿❤️✨🙏🏽 @FahadZirarAhmad #comingsoon #Family #Newarrival #gratitude #OctoberBaby pic.twitter.com/Zfa5atSGRk
— Swara Bhasker (@ReallySwara) June 6, 2023
Swara Bhasker flaunts baby bump in stunning black dress 🖤#swarabhaskar #wespotyou #motherhood pic.twitter.com/sdojrGED02
— We Spot You (@WeSpotYou) June 17, 2023
दरम्यान, स्वराने 6 जून रोजी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटोसह तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. फोटोमध्ये स्वरा पती फहादसोबत दिसली. तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातला होता. हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांचे एकाच वेळी उत्तर दिले जाते! आशीर्वाद द्या, कृतज्ञ, उत्साही! आम्ही संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवत आहोत.’ यासोबतच तिने ‘कमिंग सून’, ‘कुटुंब, ‘ऑक्टोबर बेबी’, असेही कॅप्शनमध्ये लिहिले होते.