नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे पोलाद मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सिंदिया यांच्याकडे अगोदरच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. माजी केंद्रीय मंत्री आर सी. पी. सिंह यांची राज्यसभेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा उमेदवारी न दिली गेल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सिंह यांच्याकडील खात्याची जबाबदारी सिंदिया यांच्याकडे सोपवण्यात आली.
आज श्री गणेशाची पुजा करून सिंदिया यांनी आपल्या कामकाजास सुरुवात केली. आपण आपल्या शुभचिंतकांचे आशीर्वादांच्या पाठबळावर आपल्या नव्या जबाबदारीचे निर्वहन करण्याचा प्रयत्न करू, असे सिंदिया यांनी म्हटले आहे.
राजस्थान काँग्रेसमधील मनभेद कायम; गेहलोतांनी पायलट यांना पुन्हा डिवचलं
मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाची आस असलेले नेते म्हणून सिंदिया ओळखले जायचे. मात्र, कॉंग्रेसमध्ये ते पद त्यांना सातत्याने हुलकावणी देत राहले व त्यांनी समर्थक आमदारांसह भारतीय जनता पार्टीशी घरोबा केला. त्यानंतर त्यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. आता आणखी एका खात्याची लॉटरी त्यांना लागली आहे.
…तेव्हा मोदींना पदावर ठेवून भाजपने चूक केली – यशवंत सिंन्हांचे वक्तव्य