नवी दिल्ली – भारत आणि चीनदरम्यान प्रलंबित असलेल्या सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर त्वरित तोडगा काढण्यात यावे, असा आग्रह परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत धरला. यामध्ये पूर्व लडाख सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाचाही उल्लेख जयशंकर यांनी केला.
दोन्ही पक्षांमधील संबंधपरस्पर सहमतीने आणि सर्वसमावेशक संवेदनशीलतेतून आणि परस्पर हिताचे असायला हवेत, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. बाली येथे “जी-20′ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्यानिमित्ताने जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. सीमावाद सोडवण्यासाठी लष्करी पातळीवरील चर्चा लवकरात लवकर केली जावी, या मुद्द्यावर जयशंकर आणि वॅंग यी या दोघांमध्ये एकमत झाले.
चीनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर चीनमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात यावा आणि दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवेला पुन्हा सुरुवात व्हावी, अशी अपेक्षाही जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली. चीनमधील करोना निर्बंधामुळे हजारो विद्यार्थी चीनमध्ये पुन्हा जाऊ शकलेले नाहीत. तसेच दोन्ही देशांमधील थेट विमानसेवाही करोना साथीच्या काळात खंडीत करण्यात आली होती.
ज्योतिरादित्य सिंदिया यांना आणखी एका खात्याची लॉटरी
सीमावादाबाबत बोलताना जयशंकर यांनी द्विपक्षीय कराराचे आणि प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करण्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला. तसेच वॅंग यी यांच्याबरोबर पूर्वीच्या बैठकीच्यावेळी मान्य करण्यात आलेल्या मुद्द्यांचे पालन करण्याचीही त्यांनी अपेक्षा केली. सीमाभागात ज्या बागांमध्ये अजूनही सैन्याच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
UK: : पंतप्रधान बोरीस जॉन्सन आज पंतप्रधानपद सोडणार ?