आणखी 77 पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू

मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच करोना योद्धे म्हणून ज्यांचेकडे आपण पाहतो अशा पोलिसांना देखील करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये आणखी 77 पोलिसांना करोनाचा संसर्ग असुन, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यातील करोनाचा उपचार सुरू असलेल्या पोलिसांची संख्या 1 हजार 30 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता 59 झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसेंदिवस करोनाची लागण झाल्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस दलात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

करोना लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उदार होऊन, कर्तव्य बजवावे लागत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी त्यांना सतर्क राहावं लागत आहे. मात्र, आता त्यांना देखील करोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे.

मागील चोवीस तासांत सीमा सुरक्षा दलाचे आणखी 21 जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, 18 जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या 305 जवानांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत एकूण 655 जणांना करोनावर मात केली असल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.