लंडन : ख्रिश्चन धार्मिक परंपरेमध्ये चांगले वागणाऱ्या लोकांना देवदूत नेहमी मदत करत असतात अशा प्रकारच्या कथाही सांगितल्या जातात. इंग्लंडमधील एका महिलेने आता ख्रिसमसच्या काळामध्येच आकाशात देवदूत पाहिल्याचा दावा केला असून हे देवदूताचे दर्शन झाल्यानंतर तिला लगेच मोठी लॉटरी लागल्याची माहितीही तिने दिली आहे. या देवदूतामुळेच आपल्याला हा आर्थिक लाभ झाला असल्याचे तिचे म्हणणे आहे
ट्रेसी प्रेस्टन असे या महिलेचे नाव असून कॉर्नवोल भागामध्ये एका चर्चमध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळी प्रार्थना करून ती बाहेर येत असताना तिला आकाशात देवदूत सदृश्य आकृती दिसली. आकाशातील ढगांमध्ये ही आकृती तयार झाली होती आणि त्यामधून सूर्यप्रकाश येत असल्यामुळे त्यातून एक वेगळाच संदेश जात होता. ही आकृती आपल्याला जवळ बोलवत असल्याची भावना या महिलेच्या मनात तयार झाली.
हा एखादा देवदूतच असावा असे तिला वाटले जेव्हा ट्रेसी आपल्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या मनावर अजूनही या देवदूताच्या दर्शनाचा प्रभाव होता. घरी आल्यावर तिला एका मोठ्या लॉटरीचा लाभ झाला असल्याचा मेल आला. या देवदूताच्या दर्शनामुळेच आपल्यालाही लॉटरी लागली असे तिला वाटले.
ज्या चर्चमध्ये प्रार्थना करून ट्रेसी बाहेर पडली होती. ते सेंट इंडिलन चर्च खूप प्रसिद्ध चर्च असून प्रख्यात लेखक चार्लस डिकन्स याच्यावरही या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तिला आकाशात देवदूताची जी प्रतिमा दिसली त्याचे छायाचित्र तिने काढले होते आणि तिने ते छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल ही केले तेव्हा अनेकांना ती खरेच देवदुताची प्रतिमा असावी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.