#video….आणि रत्यावर पडला पैशांचा पाऊस

जॉर्जिया : भारतात सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण झाले आहे. कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात पावसाने बॅटिंग सुरु केली आहे. मात्र तिकडे अमेरिकेत चक्‍क पैशांचा पाऊस पडला आहे. होय, अमेरिकेच्या अटलांटा प्रांतातील जॉर्जियामध्ये एका महामार्गावर डॉलरचा पाऊस पडला आणि ते घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे समोर आले आहे. सोशलमीडियावर सध्या याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अटलांटामध्ये एका महामार्गावरून जाणाऱ्या पैशांची वाहतूक करणाऱ्या गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने गाडीतील पैसे हवेत उडाले. पैसे हवेत उडाल्याने महामार्गावर एकच गोंधळ निर्माण झाला. याविषयीचा व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, रत्यावरून जाणाऱ्या एका गाडीतून पैसे हवेत उडत होते. मात्र, गाडीतील लोकांना त्याची कल्पनाच नव्हती तर ज्यावेळी त्यांना ही माहिती कळली तोपर्यंत फार उशिर झाला होता. दरम्यान, रत्यावर पडलेले पैसे गोळा करण्यासाठी लोकांनी आपल्या गाड्या रस्त्याकडेला लावल्या होत्या. या घटनेत तब्बल 1 कोटी 20 लाख डॉलर हवेत उडाले असून त्यातील केवळ 1 लाख डॉलरच पोलिसांनी हस्तगत केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)