पादचारी पुलाद्वारे पेठांशी जोडणार मेट्रो स्टेशन

पुणे – “महामेट्रो’ तर्फे संभाजी स्थानक ते डेक्कन स्थानकादरम्यान पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्याचे डिझाईन “महामेट्रो’ने प्रसिद्ध केले आहे.

वनाज ते रामवाडी या मार्गिकेमध्ये डेक्कन आणि संभाजी उद्यान ही दोन महत्त्वाची मेट्रो स्थानके आहेत. डेक्कन स्थानक हे डेक्कन पीएमपीएमएल बस स्थानकाजवळ नदीकिनारी असून, कर्वे रस्ता, खंडोजी बाबा चौक, फर्गसन कॉलेज रस्ता, आपटे रस्ता, आणि जंगली महाराज रस्त्यापासून जवळ आहे. डेक्कन स्थानकाचा अधिकाधिक लोकांना लाभ करून देण्यासाठी नदीवर पादचारी पूल बांधून नारायण पेठेचा भाग देखील जोडण्यात येणार आहे. तसेच अलका चित्रपटगृह चौक, टिळक चौक, न.चि. केळकर मार्ग जवळील परिसर डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडला जाणार आहे.

संभाजीनगर मेट्रो स्थानक संभाजी उद्यानाच्या नदीपात्राच्या बाजूला बांधण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, आपटे रस्ता भागाला हे मेट्रो स्थानक सुविधा पुरवेल. संभाजी उद्यान मेट्रो स्थानक शहराच्या जुन्या पेठ भागाला जोडण्यासाठी नदीवर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ओंकारेश्‍वर मंदिर चौक, वर्तक उद्यान आणि शनिवार पेठ या जुन्या पेठ वस्तीच्या भागांना जोडण्यात येणार आहे.

हे दोन्ही पादचारी पूल “केबल स्टेड ब्रिज’ या तंत्रज्ञानावर आधारित असून, नदीपात्रात एकही खांब उभारावा लागणार नाही. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. या पुलाचे बांधकाम वीणा वाद्यसदृश्‍य आकाराचे करण्यात येणार आहे.

दोन्ही स्थानकेही जोडणार
डेक्कन आणि संभाजी उद्यान मेट्रो स्थानके एकमेकांना पादचारी पूलाद्वारे जोडले जाणार आहे. हा रस्ता मेट्रोच्या मुख्य उन्नत मार्गिकेच्या खालच्या भागात उभारण्यात येणार आहे. एकाप्रकारे द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. वरील स्तरावरून मेट्रोची मार्गिका; खालील स्तर हा पादचाऱ्यांसाठी असेल. मार्गिकेखालील लांब पूल थेट डेक्कन मेट्रो स्थानक ते संभाजी उद्यान स्थानक इतक्‍या लांबीचा असेल. त्याचा वापर करण्यासाठी कोणतेही तिकीट घ्यावे लागणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)