जगासह भारतातही सध्या करोनाचा संसर्ग वाढत आहे. याला निर्बध घालण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असून सोशल डिस्टसिंग पालन करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोग्राफरवर भडकली असल्याचे दिसत आहे.
एका संकेतस्थळाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा फोटोग्राफरशी बोलताना दिसत आहे. सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. तुम्ही मास्क का लावले नाही. तुझे मास्क कुठे आहे?’ असे रागावताना शिल्पा दिसत आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वर्कफ्रेटबाबत सांगायचे झाल्यास शिल्पा शेट्टी लवकरच “हंगामा 2′ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती अभिनेते परेश रावल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच तिचा “निकम्मा’ हा देखील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीसोबत झळकणार आहे.