वायनाड (केरळ) – वायनाड येथील राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान गोंधळ झाला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरमळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचे योजन करण्यात आले होते. यादरम्यान अपघात घडला असून अपघातात काही पत्रकार जखमी झाले. जखमी पत्रकारांना राहुल गांधींनी स्वतः मदत करत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले.
ट्रकचा रॉड तुटून पडल्याने रिपोर्टींग करत असलेले तीन पत्रकार यावेळी जखमी झाले. याप्रसंगी राहुल गांधींनी तातडीने ताफा रोखत पत्रकारांना मदत केली.
Wayanad: Three journalists, including ANI reporter, sustained minor injuries after a barricade in Rahul Gandhi's roadshow broke. The injured were helped to the ambulance by Rahul Gandhi. #Kerala pic.twitter.com/JviwAgWX5h
— ANI (@ANI) April 4, 2019
राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत त्यांची बहिण आणि उत्तरप्रदेशच्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या. राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी सोबतच केरळ मधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेठी मध्ये राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी असणार आहे.