मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एकापाठोपाठ एक चित्रपटांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रोहित धवन दिग्दर्शित “शहजादा’या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा पासूनच फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “शहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन असणार आहे.
‘लुका छुपी’ चित्रपटानंतर कार्तिक आणि क्रिती पुन्हा एकदा सोबत स्क्रीन शेअर करत आहेत. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चाहते देखील या जोडीला पसंती देत आहेत. सध्या कार्तिक आणि क्रिती ‘शहजादा’च्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारताचा प्रत्येक कोपरा फिरत आहे. अशा परिस्थितीत तो आपली शहजादी क्रिती सेननसोबत ‘ताजमहाल’ला पोहोचला असल्याचं पाहायला मिळालं आहे. स्वतः कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ताजमहाल येथील फोटो शेअर केले आहेत.
कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘शहजादा, ताज आणि मुमताज’. यासोबतच कार्तिक आर्यनने एक सुंदर हार्ट इमोजी देखील अॅड केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत, कार्तिक आर्यनने पाठीवर ताज असलेला पांढरा टी-शर्ट घातला आहे, तर क्रिती सॅनन जी फ्लोरल ड्रेसमध्ये जबरदस्त दिसत आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.