मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसेची खिल्ली उडवली असल्याचं पाहायला मिळालं आहे. एका पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं असून, त्यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला दर्शविला असल्याचं दिसून आलं आहे. आणि हाच धागा पकडून अजित पवार यांनी मनसेवर निशा साधला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “मनसे सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले आहेत..’, असा मिश्किल टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तसेच अजित पवार पुढे म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे आधीच दाखल झाले होते. तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. नवीन पायंडे कोणी पाडू नये. महाराष्ट्राला आपण सुसंस्कृत मानतो. आव्हाड यांच्या कुटुंबाबद्दल अधिकारी बोलले असतील आणि कोणी यामागे असेल तर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे.’ असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.