नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का बसला असल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल असल्याची नोंद करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 97 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 5.01 वाजेच्या सुमारात भूकंपाचा झटका बसला. एका वृत्तसंस्थेने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार ही माहिती दिली असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कटराच्या पूर्वेपासून 97 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे 5.1 वाजता भूकंप झाला. महिनाभरापूर्वीही डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
An earthquake with a magnitude of 3.6 on the Richter Scale hit 97 km East of Katra, Jammu and Kashmir, today at 5:01 am IST: National Centre for Seismology pic.twitter.com/Gmv0giTHpx
— ANI (@ANI) February 17, 2023
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केलवर इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
रविवारी 8 जानेवारी रोजी रात्री 11.15 च्या सुमारास भूकंप झाला होता. यापूर्वी 5 जानेवारीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 5.9 रिश्टर स्केलवर इतकी नोंदवण्यात आली होती.