बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. खो गए हम कहाँ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चाहते कौतुक करत आहे. खो गए हम कहाँ मध्ये अनन्यासोबत आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसत आहेत, अनन्याने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या चित्रपटाविषयी सांगितले. तसेच एक गोष्ट उघड केली. तिने सांगितले की, तिला शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्याकडून खूप काही गोष्टी चोरायच्या आहेत.
वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अनन्याला विचारले गेले की तिला कोणत्या फिल्म फ्रँचायझीचा भाग व्हायचे आहे, तेव्हा तिने न डगमगता धूमचे नाव घेतले. अनन्याने सांगितले की ती धूमची इतकी मोठी फॅन आहे की तिला गाण्यांच्या डान्स स्टेप्सही आठवतात.
या मुलाखतीदरम्यान अनन्याला विचारण्यात आले की,’तिला शाहरुख खानकडून काय चोरायचे आहे यावर ती म्हणाली की तिला त्यांची बुद्धिमत्ता चोरायची आहे. सुहाना खानचे नाव घेतल्यावर तिने सांगितले की तिला तिचा आवाज चोरायचा आहे.’ अनन्याला जान्हवी कपूरचे लांब दाट केस चोरायचे आहेत. अनन्याला तिचे वडील चंकी पांडे यांच्याकडून सनग्लासेस आणि सारा अली खानकडून तिची शिस्त चोरायची आहे. असेही तिने या मुलाखतीत सांगितले.
जर आपण अनन्याच्या खो गए हम कहाँ या चित्रपटाबद्दल बोललो तर, यात तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे जे सोशल मीडियाचे इतके वेडे आहेत की त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या लवकरच ओटीटी डेब्यू करणार आहे. करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत असलेल्या कॉल मी बेमध्ये ती दिसणार आहे. याशिवाय ती विक्रमादित्य मोटवानीच्या कंट्रोलमध्ये दिसणार आहे. अनन्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.