घोड्यावरून शाळेला जाणाऱ्या ‘त्या’ मुलीच्या शोधात आनंद महिंद्रा

मुंबई – महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटर या सोशल माध्यमावर सजग राहत ट्विट करत असतात. देशातील घटनांपासून ते जगभरातील वेगवेगळ्या घटना यावर ते आपले मत प्रकट करतात. आज देखील आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून एका शाळकरी मुलीचा व्हिडीओ ट्विट करत ती माझी नायक असल्याचे म्हंटले आहे.

थिसुर मधील कोणालाही या मुलीची माहिती आहे का? मला या मुलीचा आणि तिच्या या घोड्याचा एक छायाचित्र माझ्या स्क्रीन सेव्हर वर ठेवण्यासाठी हवा आहे. ही मुलगी माझी नायक असल्याचे आनंद महिंद्रा यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

एका घोड्यावर शाळेत जाणाऱ्या मुलीचा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी असे म्हटले आहे की, हा व्हिडीओ जागतिक स्तरावर पोहचावा. या व्हिडिओ क्लिपमध्ये केरळमधील थिसुर जिल्ह्यातील एक शाळकरी मुलगी घोड्यावरून दहावीच्या परीक्षेसाठी जाताना दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.