सौंदर्य खुलवण्यासाठी फळे!

-योगिता जगदाळे

ज्या ज्या ऋतूत जी जी फळे येतात, ती भरपूर खावीत असे सांगितले जाते. सीझनल फळे खाणे हे अनेक दृष्टीने लाभदायक आहे. फळे आरोग्यासाठी तर उत्तमच असतात, पण ती सौंदर्यवर्धकही असतात. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे, तर सौंदर्यवर्धकही आहेत. सीझनल फळांच्या सौंदर्यवर्धक उपयोगांबाबत काही माहिती घेऊया.
ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यदायकच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत. ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. पुढे काही फळे आणि त्यांचे सौंदर्यवर्धक उपयोग दिले आहेत. तुम्हाला त्यात आणखी भरही घालता येईल.

कैरी : हल्ली आंब्याचा सीझन फार लवकर सुरू होतो. डिसेंबर जानेवारीपासूनच कैऱ्या बाजारात दिसायला लागतात. आता त्या थोड्या महाग असल्या, तरी नंतर त्या चांगल्यापैकी स्वस्त होतात. जर तुमच्या दारात एखादे आंब्याचे झाड असले, तर मग उत्तमच. त्याच्या कैऱ्या वापरता येतील. कैऱ्या त्वचा मुलायम आणि कांतिमान बनवण्यास मदत करणाऱ्या आहेत. एक कैरी उकळवून तिचा गर चेहरा, गळा, मानेवर चोळा आणि वाळल्यावर धुवा. हा प्रयोग नियमितपणे करत राहा. फरक तुम्हाल स्वत:लाच जाणवेल.

संत्री : संत्र्याची साल उन्हात वाळवावी. त्या वाळलेल्या सालींची वस्त्रगाळ पूड करून ती दुधात कालवावी. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. काही वेळाने धुवून टाकावे. खास करून तेलकट त्वचेस याचा अधिक फायदा होईल आणि चेहऱ्यादचा रंग उजळण्यास मदत होईल.

काकडी : त्वचा ब्लीच करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला चोळावा किंवा चेहऱ्यावर काकडीच्या चकत्या वा पातळ फोडी ठेवाव्यात. पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.

डाळींब : पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर दररोज चोळावेत. त्याने त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होईल. ओठांनाही त्याचा रस फिरवा, ओठांचा रंग सुधारेल. चेहऱ्याववरील डाग घालवण्यासाठी डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटावी आणि ती पेस्ट चेहरा, मानेवर लावावी. सुकल्यावर धुवून टाकावी.
पपई :पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्याऱ्यावर चोळल्यास डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते.
नारळपाणी :नारळपाणी नियमितपणे चेहऱ्यावर लावा त्यानं चेहऱ्यावरील डाग, राप निघून जाण्यास मदत होते.

केळी : पिकलेल्या केळ्याचा गर आणि मलईचा पॅक चेहऱ्यावर लावावा. पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा. त्यानंतर आधीच मधात बुडवलेल्या पिकलेल्या केळ्याच्या पातळ चकत्या चेहऱ्यावर लावाव्यात. 15 मिनिटांनी चेहरा धुवावा. त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचं आरोग्य सुधारतं चेहऱ्यावर पुटकुळ्या असतील तर केळ्याचा गर चोळून तो अर्धा तास ठेवावा. कच्च्या दुधानं चेहरा धुवावा.

सफरचंद : सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घालून चेहऱ्यावर लावावा किंवा सफरचंदाचा गर उकडून तो लावावा. वाळला की चेहरा धुवावा. याने सावळा रंग उजळण्यास मदत होईल.

खरबूज : शुष्क त्वचेसाठी खरबुजाच्या गरात एका अंड्याचा पांढरा भाग आणि थोडी मिल्क पावडर घालावी आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. त्वचा राठ असल्यास खरबुजाचा गर लावावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)