सातारा – दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू नेऊन अद्याप पैसे न दिल्याने अमित चव्हाण (रा. सातारा) याच्या विरोधात आठ लाख 753 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित चव्हाण याने पंताचा गोट येथील नंदिनी इलेक्ट्रॉनिक्समधून दि. 30 डिसेंबर 2019 रोजी येथून फ्रिज, वॉशिंग मशीन अशी आठ लाख 753 रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे घरी नेली, मात्र त्यावेळी पैसे दिले नाहीत. तर दोन दिवसात पैसे देतो, असे सांगितले. मात्र त्याने अद्याप पैसे दिले नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार नितीन विश्वनाथ अनपट (वय 40, रा. तामजाईनगर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.