पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 85 हजारांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी चार वाजेपर्यंत शहरातील 228 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 5 रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत 12 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 2590 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 381 रुग्णांचाही समावेश आहे. दिवसभरात 472 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
आजपर्यंत करोनामुळे झालेल्या रुग्णांची संख्या 80,752 इतकी झाली आहे. 765 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.